जन्म झाल्या झाल्या, आपला जन्म झाला या आनंदाच्या अश्रू च्या जागी ,आपण मुलगी आहोत याचे दुःख आसवाच्या स्वरूपात बाहेर पाडत या जगाकडे बघत नुकताच जन्म झालेल्या एका चिमुकल्या मुलीचा आणि समाजाचा हा संवाद.
"रयतेची कैवारी राजा शिवछत्रपती यांना घडवणारी राजमाता जिजाबाई , परदेशात शिकत असलेल्या माझ्या बाबासाहेबांच्या आठवणीत मर मरत असलेली, परदेशात शिकत असलेल्या नवरीला पैशाची मदत करणारी, पण आपल्या धनीची जास्त गरज आपल्या दलित समाजाला आहे याची जाणीव असलेली माझी माय रमाबाई, नवऱ्याच्या पायावर पाय ठेवून समाजा मनातील अज्ञान घेऊन मुलींना ही शिक्षणाचा अधिकार आहे हे दाखवून देणारी ,क्रांतीज्योती सावित्रीबाई अशा बऱ्याच स्त्रिया
यांचा तुम्ही जयघोष करता. "अरे निर्लज्जानों !
त्या पण एक स्त्रीच होत्या याची जाणीव, कशी नाही रे होत तुम्हाला ?लिंगापासून भेद करणाऱ्या या नीच समाजाला मला बोलण्याची इच्छा पण नाही आहे . ज्या माऊलीच्या गर्भात तुम्ही नऊ महिने राहिले ती पण एक स्त्रीच होती ना ?"
अठराव्या शतकापासून मुलींवर अन्याय होत आलेला आहे. तेव्हाच क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी या अज्ञानी आंधळ्या समाजाला न्यानाचा धडा शिकवला ! पण म्हणतात ना, जित्याची खोड मरेपर्यंत जात नसते , कारण अठराव्या शतकापासून ते आत्ताचे हे विसावे शतक, आजही समाजात अशे काही परिवार,कुटुंब आहेत जिथे आमचा तिरस्कार होतो .
तुम्ही लक्ष्मीची पूजा करतात म्हणे त्याने पुण्य लाभते, आणि एका लक्ष्मी स्वरूप कन्येची तुम्ही गर्भातच हत्या करण्याचा महापाप करता, याचे पाप कुठे फेडाल ?
देवाने सर्वप्रथम रचना केली ती स्त्रियांनी पुरूष जातीची आणि यांच्यातील एक जरी नसेल तर या सृष्टी या जीवनाचा नाश होऊ शकतो. जीवनामध्ये स्त्री आणि पुरुष या दोनच प्रमुख आणि एकमेव मुख्य अशा जाती आहेत ते पहिल्यापासून ते शेवटपर्यंत यांची तृप्ती अथांग आहे.मग का बरं तुम्ही यातल्या एका जातीचा नाश करण्यावर तुल्य आहात ??
आता शेवतीला मी तुम्हाला विनंती नाहीतर, सावध करते की , जर तुम्ही आम्हाला जन्माला येवू दिला नाही तर ,या सृष्टी वर विलय आल्याशिवाय राहणार नाही.कारण एका स्त्रीच्या छोट्याहून छोट्या लहानाहून लहान अंशामध्येसुद्धा खूप शक्ती असते .
तर मित्रांनो हा संवाद होता नुकतीच जन्माला आलेल्या एका गोंडस या कन्येचा !!
जर जन्मलेल्या मुलीला बोलता आले असते तर तिच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द ची कल्पना तुम्हाला माझ्या लेखातून सादर करण्याचा माझा हा एक छोटासा प्रयत्न होता.
वाचकांना विनंती ती की ही एक कल्पना नसून हे कटू सत्य आहे. ते जन्मलेली मुलगी जरी काही बोलू शकत नसली, तरी आपण एक मुलगी आणि मुलांमधला भेद टाळले नाही,तर मुळातूनच नष्ट केलं पाहिजे.
This article written by-
*ShantanUsk
0 Comments