Happy Mindset ची जी माणसं असतात त्याचे व्यक्तिमत्व किती आनंदी असते. मग आपण का एवढे हताश घेऊन आपले आयुष्य वाया घालवायचे बरं !
आपल्या कानावर अनेकदा आल असेल की,
'आपण एकदाच जगतो ' मी तर या वाक्यावर माझी असंमती दर्शवतो. आपण प्रत्येक क्षण जगू शकतो, मग एकदाच जगू शकतो ही तर फक्त एक मोठी अफवा आहे असे मला वाटते. (Tention) ताणतणाव सगळ्यांनाच आहेे, संकटे सगळ्यांच्याच वाट्याला येत असतात, नाही त्यांचा सर्व नकारात्मक गोष्टी घडतात. तरी सुध्दा ते त्यातून जीवन जगत असतात. आणि या स्वाभाविक गोष्टी आहेत.
"जे आहे त्यातच दुःखी होऊन, जे क्षण जगता येतात. त्या झालेल्या घटना ज्यात तुमचा काही दोष नाही, अशांच्या विचारात वेळ घालवत बसला तर कसं चालेल !"
मी तुमचा डॉक्टर नाही, पण एक मित्र म्हणून तर तुम्ही माझ्या शब्दांवर नक्कीच विश्वास ठेवू शकता, कि
तुम्ही खास व्यक्ती आहात,
फक्त तुम्हाला तुमच्या जीवनात एवढंच उत्तर शोधायचं आहे की खास गोष्टी खास का असते,
काहीतरी त्यात वेगळं असत इतरांपेक्षा,मला काय म्हणायचं आहे कळतंय तुम्हाला,
तुमच्यात पण अस काहीतरी वेगळं आहे जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते,खास बनवते.त्याचाच शोध घ्यायचा आहे.
आणि खास व्यक्ती कधी विचारात वेळ वाया घालवत नाही फक्त ती खास व्यक्ती असते आणि पृथ्वीतलावरील आणि या विश्वातील प्रत्येक वस्तू तिच्या खास आहे फक्त आपली दृष्टी त्या बाजूने सरकवली की सगळे मार्ग मोकळे होतात.
खूप छोट्या छोट्या गोष्टीत आयुष्य जगता येत असते,
एखाद्या सुंदर फुलाकडे बघत राहिल्याने किती सुंदर वाटते,
किंवा एखादे पुस्तक अगदी मन लाऊन वाचल्याने किंवा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला मिठी मारून किंवा एखाद्या भूकेल्याला अन्न देऊन...!
खूप काही आहे करण्यासारखं फक्त क्षण जगता आला पाहिजे.
"मुळात Ego ही संकल्पनाच मला पटत नाही, जर आयुष्यात तुम्ही या तीन अक्षरी शब्दाला मर्यादित ठेवला तर कर आयुष्य जगणं काय असतं ते तुम्हाला कळेल.
Artical written by - ShantanUsk
1 Comments