Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

पारंगत गुण ...! - ∆ShantanUsk™ | Blog 15

कल्पनांना वाव देतात पण स्वतःहूनकाहीच करु शकत नाही अशी भावना आजकालच्या प्रत्येक युवांमध्ये रूढ होऊन बसलेली आणि यात कोणाचा दोष नाही असे मला वाटते !
 कारण ..
 


                आजकालच्या युवकांमध्ये पण...

      त्याआधी सांगतो की ,
                                  आज  ज्याबद्दल आज मी सांगणार आहे , म्हणजे युवकांच्या प्रगती किंवा त्यांच्याबद्दल .  मी स्वतः त्याच वयाचा किंवा त्याहून कमी असे म्हटले तरी चालेल.

           तर आजकालच्या युवकांमध्ये मी सर्व काही करू शकतो ही भावना , जिद्द जागाच राहिलेली नाहीये.
                       

बरं  आज या तुमच्या आणि  माझ्या स्वप्नांबद्दल समजून घेऊ -
 सगळ्यात महत्त्वाचे स्थिती सध्याच्या चालू काळामध्ये बघितली तर , पण शिक्षण चालू असताना मुलांचा वेध हा फक्त विविध अनावश्यक गोष्टींकडे वळतो, आणि माध्यमिक शिक्षण संपेपर्यंत, त्यांना पुढे करायचे काय ? याची कल्पना नसते, ही सरासरी सगळ्यांची परिस्थिती झालेली आहे !
                   आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आपण सगळीकडून वेगवेगळ्या माध्यमातून ,आज्ञाधारकांकडून, आणि पालकांकडून बरेचदा ऐकलेले असते की,
                           "जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला, तुमच्या मधला तो एक  गुण ओळखावा लागेल,  ज्यात तुम्ही पारंगत आहेत. जे करण्यात तुम्ही कधी कंटाळनार नाही ."

               असे नेहमी ऐकतो पण खरं सांगायचं झालं तर मित्रांनो .!
                   तुमच्या मध्ये अशी कोणती गोष्ट आहे ज्यात तुम्ही खरच पारंगत आहात. तुमची  आवड आहे . ते तुम्हाला स्वतःलाच ओळखावा लागणार आहे .
     म्हणून .....,
 
                      जे आवडते त्यावर नीट लक्ष घाला ,आणि त्यालाच आपला तो पारंगत गुण बनवा ! 
           कारण कोणीही तुम्हाला सांगणार  नाही, की तुम्ही ज्या गोष्टींमध्ये पारंगत आहात, म्हणून जे काय करायचे ते स्वतःहून करा !!

     Article writing by -                                                                    ShantanUsk
Reactions

Post a Comment

2 Comments

Ad Code

Responsive Advertisement