Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

Why Is TRUST So Famous? - Shantanusk (shantanusk's Blog's ™)

'एखाद्यावर विश्वास ठेवला आणि त्याने विश्वासघात केला.'
अस कधी घडलंय का तुमच्यासोबत  ?
काही सांगायची आवश्यकता नाही कारण बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतला आहे.
तर काय बरं वाटते तेव्हा ! आता, मला जर विचारलं तर मी म्हणेन,
" काय वाटून घ्यायचं त्यात."



पण मित्रांनो,
ह्या अशा काही गोष्टी असतात ज्या फक्त स्वतःसोबत अनुभव घेऊनच समजतात.जर का तुम्ही पुस्तके वाचत असाल,तर तुम्हाला कुठेतरी हे वाक्य नक्कीच एकलेले असेल...,

' कोणावरपण डोळे बंद करून विश्वास ठेवायचा नसतो '

हो ना !



मग का आपण जाणून बुजून एखाद्यावर येवढ्या विश्वासाने त्यावर विश्वास ठेवतो की, विश्वातले सगळे विश्र्वास तोडतील, पण ही व्यक्ती अस नाही करणार.यामागे भरपूर कारणे असू शकतात.उदाहरणार्थ; तुमची त्या व्यक्तीविषयी ची आपुलकी त्याच्यापायी आपण या समाजात वावरत असतो.पण या सर्व अनुभवाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे असे मला वाटते.मग का नाही थोड्या वेगळ्या पद्धतेने या गोष्टीला घेऊ....जर एखादी व्यक्ती तुमचा विश्वास तोडत असेल,मग त्या व्यक्तीला मोठ्या मनाने माफ करून,त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून थोडे मागे टाकून पुढे गेलो तर.,  कारण एखाद्याच्या भावना दुखावणे हा सुद्धा गुन्हा आहे माझ्या दृष्टीत,आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणीच कोणाचा विश्वासघात केला नाही पाहिजे.


निशब्द....
(आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव कायतरी शिकवून जातो.म्हणून अनुभव घ्या ! आणि मित्रांनो माझ्याकडचा एक वैयक्तिक सल्ला देऊ सांगतो,कधी कधी दुसऱ्यांच्या अनुभवातून सुध्दा शिकले पाहिजे,आवश्यक नाही की प्रत्येक वेळेस अनुभवच घेतला पाहिजे.कारण जर अपघाताचं उदाहरण घेतलं, तर स्वतःच्या अपघाताची वाट बघण्यापेक्षा,एखाद्याच्या अपघातातून शिक घेऊन, वाहन सावकाश चालवले तर अपघात होणार नाही आपला, बरोबर ना !)

- ShantanUsk

  आता शेवटचे दोन शब्द..

'जर एखादी व्यक्ती आपल्यावद्दल आदर,सन्मान आपुलकी दाखवत असेल,तर उभ्या आयुष्यात  त्या व्यक्तीचा आपल्यावरचा विश्वास तुटला नाही पाहिजे, याची जबाबदारी तुमची..!'

Reactions

Post a Comment

1 Comments

Hello readers hope you like to read our blogs, for any ideas or suggestions for improvement of shantanusk's Blog's ™
Comment in comment box
Thanks for !!

Ad Code

Responsive Advertisement