जेव्हा खूप दिवसांनी लिहायला बसता, तेव्हा असच होत शब्द आठवत नाहीत, विचार मनात भरकटायला लागतात.काही सुचेनासे होते. पण मग लिहीत असताना येतो लय आपल्या लेखनाला.. मग डोक्यातले विचार एकदम सुरळीत व्हायला लागतात. मग प्रसन्न होते, मनातल्या भावना कागदावर उतरतात बघून जीवाला गारवा लागल्यासारखा वाटते.आणि हेच घडते ते फक्त लिहल्यामुळे....
बघा !
'किती सोप, पण या जगात महत्वाचे ठरलेले म्हणजे लिखाण आहे.' आणि हेच लिखाण सध्याच्या चालू वेळेचा सोडला, तर मागच्या एका दशकाला फारच कमी झालेले आहे.जसे इंटरनेट ,फोन यासारख्या माहिती माध्यमांचा शोध लागला. तर लेखी माहिती कोणाला पुरेनाशी झाली तसेच रंगीत चित्रे ,चलचित्र बरोबर मिळालेली माहिती लोकांना अधिक रुचकर वाटू लागली. आणि त्यामुळे वाचक वर्गाबरोबर लेखकवर्गही कमी होत गेला.
याचा फायदे तोटे बाजूला ठेवले तर,
माझ्या मते, तो तरुण वर्ग म्हणजे किशोरवयीन असतील, किंवा मध्यम वर्गीय यांच्यातला लेखनाचा तो रस असतो, तो कमी झाला आहे, याची मला खंत वाटत आहे..!
कारण जेव्हापासून स्मार्टफोनच आगमन झालं या लहानग्या तरुण मुलांच्या जीवनात तेव्हापासून त्यांनी लिहण्याचे माध्यमच बदलले,आणि त्याचे स्थलांतर केले ते मोबाईल फोनच्या (Key - Pad वर ) आणि ते चॅटिंगसाठी त्याचा वापर सुरू केला.आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे याची व्याधी सगळ्याच वयोगटातील लोक झाले आहे.एखाद्या गोष्टीला आहारी जाणे म्हणजे एकप्रकारे केला गेलेला स्वतःचा नाशच होय, असे मला वाटते.
माझा हा मुद्दा वर उचलण्याचा उद्देश म्हणजे खरंच,जर हे 'लिखाण' याचा कंटाळा जी आजकालची पिढी करत आहे.
जर लिखाणचं नसतं तर...
ना महाभारतात लिहल गेलं असत,
ना बायबल,
ना कुराण, ना कोणतीही माहिती, पुस्तके !
आणि मानव हा जो साक्षर होऊन इकडे तिकडे फिरतोय, तो पिढीन निरीक्षर राहिला असता. म्हणून हा लेख लिहण्याचा सार्थरुपी एकाने जरी स्वतः लेखनाचे सवय लागली अथवा लिखण्याचा प्रयत्न जरी केला, तरी माझा लेख लिहन सार्थ ठरेल,
कदाचित ते एकजण तुम्हीच असू शकता !
- ShantanUsk
0 Comments