आजचा लेख अगदी लहान पण तुम्हाला विचार करण्यात भाग पाडणारा आहे .
निकाल लागण्याचा दिवस होता , तर ओळखीच्याच एका
नववी - दहावीतील मुलाला मी विचारले,
" तुझा वर्गांमध्ये कितवा क्रमांक आला रे ?"
तो म्हणाला,
" माझा नाही, माझ्या मित्राचा आला ?"
मग मी त्याला पुन्हा प्रश्न केला,
" मग तुझा नाही येत का ,कधी पहिला नंबर ?"
तो म्हणाला ,
" नाही ! "
" तुझी इच्छा आहे का ? की तुझा पहिला नंबर यावा म्हणून !! "
मी त्याला उत्सुकतेने विचारले.
तो म्हणाला,
" आहे ,
पण मला माहितीये ,माझा नंबर नाही येणार "
{ संवाद समाप्त }
वरील दिलेल्या संवादातून त्या मुलाबद्दल काय समजले ?
मी सांगतो, त्याला पूर्ण विश्वास होता, की माझा पहिला नंबर येऊ शकत नाही . यावर त्याचा पूर्ण आत्मविश्वास होता. आणि त्याला अनुसरून तो त्या पातळीवर कार्य म्हणा, अभ्यास म्हणा करत नव्हता .
नंतर त्याला विचारल्यावर तुझी इच्छा आहे का , पहिला नंबर आणायची ?
याचे उत्तर हो म्हणून सुद्धा म्हणते,
त्याच्या मनात कुठे ना कुठे प्रथम क्रमांक मिळावा ,आपला पहिला नंबर यावा,
अशी इच्छा मनात असून देखील सुध्दा तो अविश्र्वासाने खचलेला आहे.
म्हणून या ठिकाणी आहेत तुम्हाला हेच स्वतःहून समजावून घ्यावे लागेल या उदाहरणातून कोणता बोध घ्यायचा ते....!
Article written by -
ShantanUsk.
2 Comments