4 Little Changes That'll Make a Big Difference With Your Changes (करावयाचे चार अत्यावश्यक बदल) - Shantanusk |Shantanusk's Blog's ™
4 Little Changes That'll Make a Big Difference With Your Changes Shantanusk's Blog's ™ |
बदल हे फार प्रकारचे असतात,नाही का ?
खरंच जसे तुम्ही मागच्या दोन वर्षाआधी होते तसेच आता वर्तमानाला तुम्ही नसाल. गेल्या दोन वर्षात अनेक बदल तुमच्यात झाले असतील.यात तुमचे कपडे घालण्याच्या पद्धतीत म्हणा, किंवा तुमच्या भांग पाडण्याच्या पद्धतीवर....
अशा अनेक लहानमोठ्या गोष्टीत तुम्ही बदल केला असेल,बरोबर ना !
पण हे बदल तुम्ही केलेले नसतात.ते बदल झालेले असतात वेळेनुसार झालेले असतात,त्यात आपला काहीही हातभार नसतो.
आता मित्रांनो,
मला जे सांगायचे होते त्यासाठी वरील माहिती सांगणं आवश्यक होते. आता मी जे पुढे सांगणार आहे, ते जर तुम्ही अंमलात आणले तर नक्कीच होणारे बदल हे अकास्मित,जबरदस्त आणि उत्कृष्ट असतील, याची जबाबदारी मी घेतो !!
तर,
थोडक्यात बदलांचे थोडेसे का होईना, तुम्हाला महत्त्व कळले असेल.तर हेच बदल आपण आपल्या जीवनात करायचे आहेत.पण जरा वेगळ्या पद्धतीने...
तर आपल्याला बदल करायचे आहे.,
1.आपल्या विचारांत : -
असे म्हणतात की, जसे तुम्ही विचार करता तसेच तुम्ही घडत जाता.मग तुमचे विचार जर सकारात्मक असतील, निर्मळ असतील तर नक्कीच तुमच्या जीवन पण आनंदी सुखाने समृद्ध होईल.म्हणून तुमचे विचार मित्रांनो मी 'नेहमी' शब्दाचा वापर करतोय.म्हणजे कोणतीही परिस्थिती असो.कोणताही प्रसंग असो,कोणताही अवस्था असो...!
तुम्ही नेहमी सकारात्मक आणि चांगलेच विचार करायचे आहे.
याने होणार काय ?
याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला हे अंमलात आणावे लागेल.
अजुन ज्यात आपल्याला बदल करायचे आहे,
आपल्याला ते म्हणजे,
2. आपल्या सवयीत : -
'माणसाच्या सवयी त्याला यशस्वी बनवतात'
यावर तुमचं मत काय ?
माणसाच्या म्हणजे आपल्या सवयी आपली वागणूक,वर्तन आणि स्वभाव ठरवतात.
तर मित्रांनो,
आपल्या सवयीत बदल करण्यासाठी तुम्हाला आधी तुम्हाला तुमच्या सध्याच्या म्हणजे आता ज्या सवयी असतील त्यांची जरा दखल घेतली पाहिजे.
त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ?
की तुम्हाला तुमच्या आधीच्या जेवढ्या सवयी काही सवयी असतील त्या एका कागदावर लिहून, त्या सर्व सवयींचे चांगल्या आणि वाईट सवयीत वर्गीकरण करायचे आहे. वर्गीकरण केल्यानंतर ज्या वाईट सवयी आहेत. त्यामध्ये बदल करायचे आहे.
उदा., रात्री उशिरापर्यंत जागरण करणे असेल,किंवा सकाळी उशीरा उठणे असेल.
हे वर्गीकरण तुम्ही स्वतः किंवा कोणी आपल्याहून आदरणीय व्यक्ती, घरातील मोठे कोणी यांसोबत मिळून एकदम प्रामाणिकपणे, त्यांच्याशी संवाद साधून,सल्ला घेऊन सवयीत बदल करायचा आहे.
आणि पुढे ज्यात तुम्हाला बदल करायचा आहे ते म्हणजे...
3. आपल्या स्वभावात : -
प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो, तसेच नैसर्गिक सुध्दा असतो.यात काही शंका नाही.पण आपल्या हाती असते, आपण आपला स्वभाव कसा ठेवला पाहिजे.जर आपला स्वभाव
मार्मिक असला,
दयाळू असला,
सर्वांशी चांगले वागणारा असेल,
तर नक्कीच, आपला मित्र परिवार हा विशाल असेल, इतरांशी असलेले स्नेहसंबंध आणखीनच घट्ट बनतील.म्हणून मित्रांनो तुम्हाला बदल करावयाचा आहे तो तुमच्या स्वभावात !
'आपला स्वभाव आपले व्यक्तिमत्व दर्शवत असते'
त्यांना अनुसरून आपला स्वभाव हा चांगला योग्य तसेच अप्रतिम असला पाहिजे याची दक्षता घेऊन आपल्या स्वभावात बदल करायचा आहे.
शेवटचा बदल जो तुम्हा करायचा आहे तो म्हणजे..
4. आपल्या शरीरात : -
पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीवांमध्ये शाररिक बदल हे होत असतात.आणि ते आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे तसेच योग्य असतात. कारण
आपले शरीरच आपली खरी संपत्ती आहे
"आरोग्य धनसंपदा"
मग आपण जसे बाकीच्या इतर हजार गोष्टीवर लक्ष देत असतो, तसेच आपल्या शरीरावर देखील, तेवढेच लक्ष दिले पाहिजे.पण मग शारारिक अर्थातच आपल्या शरीरात कोणते बदल करायचे आहेत ?
शरीरात बदल करायचे म्हणजे आपल्या शरीराला जास्त चालण्याची सवय लावण्याचा बदल करायचा आहे, कारण या धावपळीच्या काळात सर्वसाधारणपणे आपण सगळेच जास्ततर वाहनांचाच वापर करतो. पदयात्रा खरं तर आपण स्थगितच केली आहे. तर बदल हेच करायचा आहे, शरीराला चालण्याची सवय लावायची आहे.
त्याचबरोबर शरीर निरोगी कसे राहील त्यासाठी शरीरात बदल करायचे आहेत.
उदा.,
बाहेरचे अन्नपदार्थ खाणे कमी करणे असेल
,किंवा संतुलित आहार घेणे असेल,
प्राणायाम करणे,व्यायाम करणे असेल इ.
पण हे नियमित करणे ही अट आहे.
0 Comments