माझ्या मित्रांनो, आज मी अशा एका गोष्टीवर माझा ब्लॉग लिहत आहे, जे वाचून तुमचा जन्म महाराष्ट्राच्या मातीत झाला याचा अभिमान तुम्हाला वाटेल, याची खात्री मी स्वतः तुम्हास देतो !
आपल्या महाराष्ट्राला भूगोला सोबतच लाभलेला आहे तो म्हणजे इतिहास कारण जेवढी विस्तृत अशी नवल वाटेल एवढी एवढी प्रख्यात आणि अंगावर शहारे येतील असा इतिहास आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे,
कित्तेक महामानव, संत, विचारवंत, राजे-महाराजे आणि विख्यात व्यक्तींचा जन्म या मातीत झाला. एवढं महत्त्व सगळ काही दडलेला आहे या मातीत...
आणि मित्रांनो, याच मातीतल्या एका खेळा विषयी तुम्हाला मी आज सांगत आहे, त्या खेळाचे नाव आहे म्हणजे 'मातीतली कुस्ती'
कित्येक शतकापासून भारतात आणि महाराष्ट्रात खेळत असलेला हा खेळ !
मातीतल्या कुस्तीची जेवढी प्रशंसा करावी, तेवढी कमीच. पण दुर्दैव याचे वाटत आहे की, आधी जो खेळ प्रत्येक गावागावांमध्ये मोठ्या उत्साहाने खेळला जायचा, त्याचे चाहते लाखोंच्या घरात होते .आत्ताचे जे स्वतःला नवीन पिढीतले संबोधून घेत आहेत त्यांनी या खेळाला विलुप्त होण्याच्या मार्गावर आणून ठेवले आहे.
पूर्वी राजेशाही असताना मातीतल्या कुस्त्यांचे आयोजन राजे-महाराजे करायचे.आणि त्याच बरोबर त्या पैलवानाचे आहार तसेच खुराक हे देखील तेच पुरवायचे.त्यामुळे पैलवान सुद्धा प्रामाणिकपणे आपल्याला होत असलेल्या मदतीचा, आपला सन्मान त्याची राखण करण्यासाठी तो सुद्धा तेवढेच कष्ट करायचा, मेहनत घ्यायचा.
राजेशाही नंतर आला तो काळ म्हणजे लोकशाहीचा !
नाना प्रकारचे बदल होत गेले, नवनवे नियम आणण्यात आले. पण वाळीत राहिला तो विषय म्हणजे मातीतल्या कुस्तीचा !
मातीतल्या कुस्तीची परंपरा फक्त जे जुने माणसं शिल्लक राहिले आहेत, तेच त्याची जपणूक करत आहे ते सुद्धा विनामानधनानी म्हणजेच विना मानधन घेता.
तर हे झाले याविषयी माझे सांगण्याचा उद्देश म्हणजे
"बाळाचा जसा गर्भात असताना आपल्या आईच्या नाळेची संबंध असतो तसा आपला या मातीशी संबंध आहे."
पण जेव्हापासून आपण सिमेंट काँक्रीटच्या बारा-तेरा मजली इमारतीत राहायला गेलो आहे. तेव्हापासून मातीचा आणि आपला संबंध जसा तुटला की काय ? या टप्प्यावर येऊन ठेवलेला आहे.हा संबंध तूटण्याचे कारण म्हणजे आपले कमी होत असलेले मातीवरची प्रेम...
तुम्ही कितीही मोठे झाले तरी तुम्ही तुमच्या आईला कसे विसरणार ? मग मला हे सांगायचे आहे की,
मातीची जपणूक करणारा हा गावठी खेळ म्हणजेच मातीतली कुस्ती याकडे दुर्लक्ष का ?
याकडे आपलेही आणि सरकारचे ही..!
एक पैलवान जेव्हा तालमीत जाऊन,घाम गाळून जबरदस्त खुराक घेतो तेव्हा कुठे जाऊन एक पैलवान बनतो. आणि पैलवान झाल्यानंतर जेव्हा अजून कष्ट करून नवीन डावपेच शिकून, (महाराष्ट्र केसरी),(हिंद केसरी) असे पद पटकावतो. मग या पैलवान जेव्हा कुठे आपण एखाद्या ठिकाणी काम करताना बघतो,तेव्हा ती किती दुर्देव आहे. कारण त्या पैलवानाला कोणते दुसरे संसाधन अस नसते कमाईचेे !
मग आपल्या सरकारने पैलवानांना दरमहा एक मोजकी रक्कम जरी त्यांच्या खात्यात जमा केली,तर त्यांचे प्रपंच भागेल, तसेच त्यांच्या खुराकाचे सोय केली तर कुठे जाऊन ते आपली संस्कृती टिकणार आहे,
कारण जर काही आमदानीच त्याला मिळत नसेल तर तो पैलवान त्याच्या प्रपंचासाठी करणार तरी काय ?
एक ही एक मागणी मला या माझ्या लेखनातून करायचे आहे कारण खरी परिस्थिती सांगायची झाली तर लोकांचा कल याकडे फार कमी होत चाललेला आहे.
मित्रांनो, आपण शिवरायांच्या राज्यातली माणसं ! आपली संस्कृती जपणे हे महाराजांनी आपल्याला शिकवण दिली आहे. मग मातीतली कुस्ती तर, आपली संस्कृती आहे. याची जपणूक करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे.
तर हे माझे शब्द त्या मराठी माणसाच्या काळजापर्यंत पोहोचले असतील तर तो नक्कीच याकडे लक्ष घालेल आणि आपले योगदान नक्कीच देईल.
तर तुम्ही यासाठी काय करू शकता,
मी सांगतो,
तर तुम्ही फक्त तुमच्या सोशल मीडिया माध्यमावर सगळीकडे एकही Platform न सोडता उदा.(Facebook, Instagram, Twitter Pinterest..etc) जे सर्व काही मोठी नेतेमंडळी आणि कोणतेही प्रसिद्ध म्हणजेच celebrities यांना Tag देऊन,
#save_मातीतली कुस्ती
हा Hashtag चा वापर करून आपले मत मांडण्याची आहे आणि ती पोस्ट करायचे आहे आणि हो मला टेक द्यायला विसरू नका माझे सर्व सोशल मीडिया आयडी मी खालील प्रमाणे तुम्हाला देतो.
0 Comments