डिसेंबर 2019 पासून ऐकण्यात आलेल्या एका विषाणूमुळे चीनमध्ये खूप लोक मृत्युमुखी पडत आहेत अशा प्रकारच्या बातम्या आपल्या कानावर येत होत्या...!
कोणाला माहीत होते की, ह्या विषाणूचा विस्तार एवढा होणार आहे, आणि याचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे. असेच प्रत्येकाला याला सामोरे जावे लागणार !
• उपचार
- या आजारावर निश्चित असे औषध सध्या उपलब्ध नाही.
- दृष्टोत्पत्तीस आलेल्या लक्षणांवर लाक्षणिक उपाययोजना करतात.
- गंभीर अवस्थेत रुग्णाला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्याची गरज पडू शकते.
• २०१९-२०२० वुहान कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक
१३ मार्च २०२० अखेर जगात १, ३२, ७५८ जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण ४९५५ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १२२ देशांमध्ये हा आजार पसरला आहे. चीनमधील हुबेई प्रांतात या आजारामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत. हुबेई प्रांतातील वुहान शहरातून या विषाणूची लागण सुरू झाली. या आजारामुळे चीन देशात १३ मार्च २०२० अखेर ३१८० जणांचा बळी गेला असून ८० हजार ९९१ जणांना लागण झाली असल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती जारी केली आहे.[२]
कोरोना व्हायरस पीडित माणसाला शिंका येत नाहीत
• करोना व्हायरस आणि इतर रोग-तुलना
• भारतामध्ये कोरोना व्हायरस
दिनांक २२ मार्च २०२० पर्यंंत भारतातील कोरोना रोगाच्या रुग्णांचा आकडा ३४२(कोरोना ताजी माहिती) इतका आहे. भारतात एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पहिला मृत्यू दि.१२ मार्च २०२० रोजी कर्नाटक राज्यातल्या कलबुर्गी जिल्ह्यात ७६ वर्षाच्या वृद्धाचा झाला. दुसरा १३ मार्च २०२० रोजी दिल्लीतील एका वृद्ध महिलेचा झाला.
• महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस
महाराष्ट्रामध्ये दिनांक २२ मार्च २०२० पर्यंंत ७४ ( कोरोना ताजी माहिती) कोरोना रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रामध्ये दिनांक २२ मार्च २०२० पर्यंंत २ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. महाराष्ट्रातील इतिहासात प्रथमच सर्व महत्वाची देवस्थाने बंद ठेवण्यात आली आहेत.
• व्हायरस' हा मध्यवर्ती विषय असलेले इंग्रजी चित्रपट
- The Andromeda Strain (१९७१). (Michael Crichtonच्या कादंबरीवर आधारलेला चित्रपट)
- Carriers (२००९)
- Contagion (२०११)
- The Flu (२०१३) : H5N1 या विषाणूवरील साऊथ कोरियन चित्रपट
- The Happening (२००८)
- I am Legend (२००७)
- Outbreak (१९९५)
- Pandemic (२०१६)
- 12 Monkeys (१९९५)
• कोरोना व्हायरसचा उल्लेख असलेले पुस्तक
- १८८१ साली प्रकाशित झालेल्या 'The Eyes of Darkness' या Dean Koontz[३] लिखित कादंबरीत वुहान-४०० या विषाणूची कल्पना मांडली आहे. पण यात या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचे व लक्षणांचे वर्णन कोरोनापेक्षा पूर्ण वेगळे आहे. समाजमाध्यमांवर मात्र या उल्लेखाचा दुरुपयोग करून 'चीन हा देश कोरोना व्हायरस हे जैविक हत्यार म्हणून वापरण्यासाठी विकसित करत आहे' अशी खोटी बातमी पसरवली जात आहे.[४]
• 'व्हायरस' या विषयावरील कादंबऱ्या
- The Andromeda Strain (Michael Crichton)
- The Scarlet Plague (Jack London)
- The Stand (Stephen King) (या कादंबरीवर १९९४ साली अमेरिकेच्या दूरचित्रवाणीवर मालिका निघाली होती.).
• संदर्भ
- ^ "Q&A on coronaviruses (COVID-19)". www.who.int (इंग्लिश मजकूर) (जागतिक आरोग्य संस्था). जागतिक आरोग्य संस्था. 14 मार्च 2020 रोजी पाहिले.
- ^ जागतिक आरोग्य संघटना. "Coronavirus disease 2019 (COVID-19), Situation Report – 53". https://www.who.int/. १४ मार्च २०२० रोजी पाहिले.
- ^ "Title: The Eyes of Darkness". www.isfdb.org. 2020-03-14 रोजी पाहिले.
- ^ "Partly false claim: a 1981 book predicted the coronavirus 2019 outbreak". Reuters (en मजकूर). 2020-03-11. 2020-03-14 रोजी पाहिले.
0 Comments