• Disclaimer •
अस्वीकरण
सदर प्रसंग तसेच त्यातील व्यक्ती ,स्थान हे काल्पनिक असून, त्याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाहीये,वाचकांनी प्रसंगातील घडलेल्या घटनेतून एक चांगला बोध घ्यावा, हा आमचा हेतू आहे,म्हणून तुमच्यासमोर आम्ही प्रसंगा स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
- Shantanu Khandare
Admin
Shantanusk's Blog's ™
न सांगितलेला प्रसंग......
माझ्या हायस्कूल चा पहिला दिवस होता.
मी सकाळीच सगळी तयारी करून कॉलेजला निघालो होतो. माझ्याकडे एवढे काही चांगले कपडे नव्हते, बाकीच्या सारखे पण एक गर्द लाल शर्ट, जीन्स आणि त्यावर काळया बुटांमध्ये कॉलेजमध्ये, मी पहिले पाऊल टाकले.
पहिले पाउल टाकताच माझ्या मागून एक मोठी मोटारगाडी आली तिने मला कट मारला ,
आणि मी गेटच्या शेजारी समोर जाऊन पडलो.माझे बरेचसे कपडे मिळाले होते, पण कसं तरी ते कपडे झटकत मी उभा राहिलो.
माझी बॅग उचलली आणि वर्गाकडे वेध घेतला. क्लासरूम कडे जाताना मला जास्त तर सगळे ग्रुपमध्ये बोलताना ,मजामस्ती करताना, गप्पा मारताना दिसत होते. त्यांना बघत बघत मी चालत निघालो.
अचानक माझ्यासमोर एका मुला-मुलींचा ग्रूप आला. त्यांच्या मनात माझी रॅगिंग करावी, असा असंच काहीतरी असेल !
त्यातल्या एकाने माझा बॅग मधली बॉटल काढली आणि त्यातले पाणी माझ्या बॅगमध्ये टाकले .!
मी स्तब्ध उभा होतो. मी त्यावर काही प्रतिक्रिया न केल्यामुळे , तो जरा गडबडला.
त्याने माझ्या खिशात हात घातले, त्यामध्ये माझे पासपोर्ट फोटो होते.ते खिशातून काढून त्याने ते रस्त्यावर फेकले.आणि त्याच ग्रुप मधल्या काही मुलांनी ते पायाखाली तुडवले.
तरीसुद्धा
मी शांतच उभा होतो.
पण त्यातल्या एका मुलीचे लक्ष माझ्याकडे होते. तिच्या डोळ्यात मला त्रास देताना, बघवत नसेल. असं मला वाटलं !;
मी काही बोलल नाही म्हणून. तो मुलगा खूपच चिडला. आणि रागत माझ्यावर हात उद्गारला !
तो हवेतच थांबला .,
त्याने तो हात खाली घेतला .
मान खाली घालून तो स्तब्ध उभा राहिला.
काही क्षणात त्यांनी दोन्ही हात जोडून ,
माझी माफी मागितली.आणि मला मीठी मारली,
कदाचित,
त्याने केलेल्या कृतींचा त्याला पश्चात्ताप झाला असावा ?
आणि मला नंतर कळलं तो माझ्याच वर्गातला ग्रुप होता. नंतर ते सगळे माझे
मित्र झाले.
पण
जेव्हा ते मुलं मला त्रास देत असताना, ज्या मुलींच्या मनात माझी काळजी दिसली होती.....!
" ती मुलगी मला परत दिसलीच नाही "
• वरील घटनेचा सारांश सांगायचा झाला तर, मित्रांनो -
प्रत्येक वेळेस प्रतिक्रिया करणे गरजेचे नसते . हेच संकटाच्या बाबतीत सुध्दा कधी कधी शांत राहून संकटावर मात करायची असते .
"संकट हे एका वाघाप्रमाणे असते , ते तुमच्या जवळ येते , तुमची पडताळणी करते .जर तुम्ही हालचाल किंवा पळण्याचा प्रयत्न केला, की मृत्यू
निश्चित ........!”
Written by - ShantanUsk
0 Comments