"वाळवंटात पाणी सापडण्याहून कठीण आहे , एखाद्या विषयावर अनुच्छेद (Blog ) लिहिणे . आपल्या मनातील भावना शब्दात व्यक्त करणे, हे काही सोपं काम नाहीये. आणि यासाठी खूप खडतर प्रयत्न करावे लागतात ,असेही काही नाहीये"
पण मित्रांनो,
मनातले शब्द कागदावर उतरणे, ही सुद्धा एक कला आहे.
यात एवढा आनंद भरलेला आहे की , तो न सांगता येणारा आहे . एकमेकांच्या मनातील विचार हे न सांगता कळता येतात. यात जेवढा आनंद मिळतो, तो काळजाला गारवा देणारा असतो.
म्हणून लेखनाची आवड असावी असे मला वाटते.
"एकांतात लिहलेल्या लेखनात खूप काही दडलेले असते."
लिहिताना मन रोजच्या वैतागतून दूर... स्वतः पलीकडे विचार करत असतो. आणि तेच विचार शब्दरूप पानावर उतरत असतात.
लहापणापासूनच तुमच्या मनात टाकलेले जे की,
"लिहणे म्हणजे अभ्यास "
हे आधी काढून टाका .
लिहल्याने मन मोकळे होते याचे उदाहरण द्यायचं झालं तर..,
एका पानावर तुमच्या जीवनातल्या आतापर्यंतच्या सगळ्या चांगले प्रसंग लिहून काढा. ते आठवा ,त्यांचे विवेचन करा, त्यात पूर्णतः सामील व्हा.,
जसे काय तुम्ही ते, प्रत्यक्ष अनुभवत आहात !!
मग बघा !
तुम्हाला कळेल की, लिहण्यात किती मज्जा असते ते....!!
0 Comments