माणसाची प्रगती त्याच्या मर्यादा स्पष्ट होतात,त्या त्याच्या विचारांनी आणि त्याचबरोबर आतापर्यंत करत आलेल्या प्रवासाने., हा प्रवास मात्र न थांबणार असतो - न थांबणारा.........
आपला जन्म होतो..आणि सुरू होतो तो,जीवनाचा प्रवास, मूल लहानच मोठं होते, आणि काही वर्षातच चालायला लागते.त्याला शाळेत टाकले जाते.तो त्याच प्राथमिक शिक्षण पूर्ण करतो, थोड्या काळानंतर माध्यमिक शिक्षण,मग उच्च माध्यमिक नंतर नोकरीचा शोध ! बापरे एवढंच नाही तर...!
नोकरी भेटल्यानंतर सुध्दा न थांबता कष्ट चालूच असतात.या कष्टांच्याच कालावधीत लग्न होते,मुलबाळ होतात. आपले वय होत जाते आपण वृध्द होतो, आणि मग एके दिवशी आपला श्वास सोडतो. तरीही वेळ आणि जीवन चालूच असते न थांबता ! एकदम ( unstoppable )
'एकच आयुष्य ! त्यात पण आपण, ते फालतू गोष्टीत वेळ आणि जीवन घालवावे यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नाही.'
या ब्रम्हांडात अनेक गोष्टी unstoppable म्हणजे कधीच न थांबणाऱ्या आहेत. आणि त्यात मानव सुध्दा येतो,
खरंच मित्रांनो तुम्ही पण त्यात येता. मानव
जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास हा अखंडपणे करत असतो, न थांबता ! अगदी झोपताना सुध्दा तुमच्या शरीराचे कार्य चालूच असते.
जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास हा अखंडपणे करत असतो, न थांबता ! अगदी झोपताना सुध्दा तुमच्या शरीराचे कार्य चालूच असते.
'बस तुमच्या या unstoppable पणाला थोड्या वेगळ्या प्रकारे, तुम्हाला लावायच आहे.'
हा unstoppable पणा श्रीमंत बनण्यात लावा, चांगले सुदृढ निरोगी शरीर बनवण्यात लावा, आणि अशा अनेक गोष्टी ज्या तुम्हाला आवडेल, अगदी हात ठेवला ती गोष्ट मिळविल एवढ्या सकरात्मकातेने बनण्यात लावा.
विना कष्टाचं काहीच नाही मिळत, आणि कष्ट करून काही मिळणार नाही असे होण तर अशक्यच आहे. म्हणून कष्ट करा, तुम्ही केलेला प्रत्येक हा तुमच्या यशाचा भाग असतो. प्रयत्न करत रहा, यश तुमचंच आहे.
Article written by - shantanUsk
Read our popular Blogs :
∆ backllinks ∆
5. Must read
📤📤📤📤📤📤📤📤📤📤📤📤📤
3 Comments
After reading the blog