वाचकांना समजावा म्हणून एक सोपे अशे उदाहरण देतो जेणेकरून तुम्हाला कळेल मी काय सांगायचा प्रयत्न करत आहे
तर होते काय संकटे हे एका वारकरीसारखे आहे . त्याची सुरवात कोणत्यापण गावापासून का होईना, शेवट मात्र हा पंढरपुरातच होतो .असंच आहे संकटाच्या बाबतीत पण संकटाचे सुरुवात कोणत्याही कारणापासून झाली तरी त्याचा शेवट मात्र सुख आणि यश असतो . प्रत्येकाचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा असतो.मला माझ्या गुरूंनी सांगितले होते की, आपल्याला विद्यालयात काटकोन ,त्रिकोण, चौकोन हे सर्व कोण शिकवतात, पण मात्र दृष्टिकोन हे नाही शिकवत, तू स्वतःला आत्मसात करावा लागतो
मी तर म्हणतो,
प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा सकारात्मक आणि निर्भयी असला पाहिजे
तर आपला महत्त्वाचा मुद्दा, की संकटापासून तर काय पळून जाता येत नाही आणि त्याचे निर्भयपणे सामना करण्याची हिम्मत ही प्रत्येकामध्ये नसते , टेन्शन हे एका हवा नसलेल्या फुग्यासारखे असते त्यामध्ये आपण आपल्या मनातील विचार स्वरूपी हवा भरून ते फुगवत असतो म्हणजे ते संकट वाढवत असतो
संकटात काय करावे -
- अशा वेळी आपले मन स्थिर असणे,य फार आवश्यक असते.
- नको त्या दुसऱ्यांच्या विचारांचा सल्ला घेऊन चुकीचे निर्णय घेणे.
- संकटे ही किती पण मोठे असले तरी त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ देऊ.
- गुरुजनांचा आणि मोठ्यांचा सल्ला घ्यावा.
- संकटात असल्यावर सर्वात आधी आपल्या परिवाराचे हितगूज करायची .
- वयाने लहान किंवा मोठ्या मित्रांचा सल्ला अजिबात घ्यायचा नाही.
मित्रांनो एखादा लेख लिहिण्या इतकी माझी वयोमर्यादा नाही ,पण मी हे दाखवून देणार की असे नाही की ,विद्वानच आणि खूप शिक्षण घेतलेलेच या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतात !!
1 Comments