Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

#SayNoबघु_पुढं - Shantanu Khandare | shantanusk's Blog's ™

जसे एकदा गेलेली वेळ परत येत नसते,आणि नंतर आपल्याला पश्चातापाचा मारा सोसावा लागत असतो, अगदी त्याप्रमाणे असते आपल्यासमोर येणाऱ्या सर्व सुवर्णसंध्या..! आपल्यासमोर बरेच वेळा खूप मोठ्या संधी येत असतात, पण आपण एका शब्दामुळे त्या मोठमोठ्या संध्या नाकारतो ते शब्द म्हणजे ' बघू पुढं ' !


बस मित्रांनो,
या एका शब्दामुळे कित्येक लोकांचे स्वप्ने हे फक्त स्वप्नेच राहून बसले आहेत.कारण जर एखाद्याने किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीनेच आपल्याला एखादी कल्पना किंवा काही नवीन विशेष करण्याची संधी समोर टाकली असेल,तर फक्त काहीतरी यात आपला तोटा असेल किंवा यात काही पुढे होणार नाही हे निरर्थक आहे अशावेळी त्याबद्दल संपूर्ण नाकारता प्रकट न करता,आपण एका शब्दाचा उच्चार करतो ते म्हणजे 'बघू पुढे' !


मला यावर काही माझे विचार तुमच्यासमोर मांडावे वाटले,त्यासाठी मी हा लेख तुमच्यासमोर प्रस्तुत केला.
म्हणून आपण 'बघू पुढं' या शब्दाचा वापर टाळा किंवा नष्टच करून टाका.कारण एखाद्याच्या सांगितल्यावर त्यानंतर जेव्हा आपल्याला प्रत्युत्तर द्यायच्या वेळेस 'बघू पुढं' म्हणण्याऐवजी स्पष्टपणे नाही म्हटलेले १०० वेळा बरे !
म्हणून आपल्याला या शब्दाचा अर्थात या शब्दात लपलेल्या नकारात्मकतेचा नायनाट करायचा आहे.


त्यासाठी पहिला प्रयत्न मी स्वतः केला आहे. यावर माझे विचार मांडण्याचा... (खालीलप्रमाणे)

"सध्याच्या लोकांचा जर आढावा घेतला तर,
तर 'बघु पुढं ' हा शब्द जोपर्यंत त्यांच्या जीवनातल्या शब्दकोशातून निघत नाही.
तोपर्यंत माझ्या मते त्यांची प्रगती स्थगित आहे."

-

शंतनु संजय खंडारे

(Blogger/Writter)

त्यासाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करावे लागतील,त्यासाठी एक छोटासा उपक्रम मी माझ्या या ब्लॉग वेबसाईट द्वारे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.

ज्याचं नाव असेल, #SayNoबघू_पुढं

(तर मित्रांनो,मी स्वतः तुमच्यासमोर एक संधी टाकली आहे,तुमचे जे विचार असतील ते मला कळवा लेखी अथवा व्हिडिओ च्या स्वरूपात. हा hashtag वापरून - #SayNoबघू_पुढं )


Reactions

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement